आंबेडकरांचे नातू आनंदराज यांच्या काँग्रेस प्रवेशाची अफवा

वृत्तसंस्था
रविवार, 5 मे 2019

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शनिवारी सायंकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आनंदराज यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. 

नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची अफवा असल्याचे स्वतः त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शनिवारी सायंकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आनंदराज यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, त्यांच्या पक्षाचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनीही सांगितले, की आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्येच आहोत.

दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघातले उमेदवार मागे घेत असल्याची घोषणाही केल्याचेही वृत्त होते. आनंदराज यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने देशभर खळबळ उडाली होती. अखेर आनंदराज यांनीच स्पष्टीकरण देत हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rumors on Babasaheb Ambedkars Grandson Anand Raj Ambedkar Joins Congress