टिकटॉकसाठी त्याने लग्नात उडविले तब्बल एक कोटी रुपये

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

टीकटॉकवर फेमस असलेल्या या रुषीराजला जवळपास पाच कोटी फॉलोअर्स आहेत. त्याचे फॅन्स त्याला जयराज या नावाने ओळखतात. त्याचे गाड्यांवर असलेले प्रेम आणि घोडेस्वारीसाठीही तो ओळखला जातो. त्याच्या लग्नात त्याने 2000 आणि 500 च्या नोटांच्या रुपात तब्बल एक कोटी रुपये उडविले आहेत.  

अहमदाबाद : सध्या टीकटॉक व्हिडिओसाठी लोकं काय करतील याचा नेम राहिलेला नाही. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या एका लग्नात नवरदेवाने फक्त टीकटॉक व्हिडिओसाठी तब्बल एक कोटी रुपये नुसते हवेत उधळले आहेत. गुजरातमधील जडेजा ग्रुपचा मालक असलेल्या रुषीराजसिंह जडेजाच्या लग्नात नुसत्या वरातीतच एक कोटी रुपये उधळले आहेत आणि कारण काय तर फक्त टीकटॉक व्हिडिओ. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रुषीराजसिंह जडेजा याने आठवड्याभरापूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न केले. टीकटॉकवर फेमस असलेल्या या रुषीराजला जवळपास पाच कोटी फॉलोअर्स आहेत. त्याचे फॅन्स त्याला जयराज या नावाने ओळखतात. त्याचे गाड्यांवर असलेले प्रेम आणि घोडेस्वारीसाठीही तो ओळखला जातो. त्याच्या लग्नात त्याने 2000 आणि 500 च्या नोटांच्या रुपात तब्बल एक कोटी रुपये उडविले आहेत.  

लग्नाच्या वरातीत त्याने ही पैशांची उधळण केली आहे. त्याची वरात सुरु असताना पैशाचा या पावसामुळे रस्त्यावरील माणसे त्याची वरात चकीत होऊन पाहातच राहिले. तसेच एका टीकटॉक युझरने त्याच्या वरातीत उडविलेले पैसे गोळा केले आणि तब्बल 46,500 रुपये गोळा केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rushiraj Sinh Jadeja showered almost 1 crore at his Barat in Gujarat