
नवी दिल्ली : कच्चे तेल खरेदी करत असल्याबद्दल अमेरिकेकडून भारतावर दंडात्मक कारवाई होत असल्यामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी रशियाकडे ‘विशेष यंत्रणा’ असल्याचे रशियाचे राजनैतिक अधिकारी रोमन बाबुश्किन यांनी सांगितले. तेलखरेदीवरून दबाव आणणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, रशियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी रशियाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.