Russian Influencer Kristina to Leave India
esakal
रशियाची प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्लुएन्सर क्रिस्टिनाने भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. 'कोको इन इंडिया' या नावाने प्रसिद्ध असलेली रशियन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर गेल्या काही दिवसांपासून भारतात राहते आहे. मात्र, दिल्लीतील एका महिला अधिकाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिल्याने आता तिने देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.