
किव्ह : युक्रेनवर ड्रोनवर वर्षाव करणाऱ्या रशियाने आज जमिनीवरील कारवाई करताना युक्रेनच्या ईशान्येकडील सुमी भागातील चार गावांचा ताबा घेतला. युक्रेनच्या सीमेवर एक ‘बफर झोन’ तयार करण्याचे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर त्यांच्या सैनिकांनी आज युक्रेनमध्ये घुसत चार गावांवर नियंत्रण मिळविले. रशियाच्या आजच्या कृतीमुळे शांतता चर्चा सुरू करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला पुतीन यांनी केराची टोपली दाखविली असल्याचे स्पष्ट झाले आहे.