
कर्नाटकातील गोकर्ण येथील जंगलात रशियन महिला नीना कुटीना (वय 40) आपल्या दोन मुलींसह गुहेत राहत होती. 2017 पासून त्या या जंगलात वास्तव्यास होत्या. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई केली आणि भूस्खलनाचा धोका आणि विषारी सापांच्या भीतीमुळे नीना आणि तिच्या मुलींना गुहेतून बाहेर काढले. नीना यांनी मात्र आपले गुहेतील जीवन समाधानकारक आणि आनंददायी असल्याचे सांगितले. त्यांच्या या अनोख्या कहाणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.