

Rwanda’s Economic Transformation: A Rising Power in East Africa
sakal
भारत आणि रवांडा यांच्यातील आर्थिक, तांत्रिक आणि शैक्षणिक सहकार्य अधिक मजबूत होत आहे. आफ्रिकेतील छोटा; पण वेगाने प्रगती करणारा देश म्हणून रवांडाने गेल्या दोन दशकांत उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणले आहे. स्वच्छ प्रशासन, डिजिटल सेवांवर भर, पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील सुधारणा यामुळे रवांडा आफ्रिकेतील उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो. भारत-रवांडा दोन्ही देशांमध्ये डिजिटल अर्थव्यवस्था, स्टार्टअप आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्य वाढत आहे.