
नवी दिल्ली/मॉस्को : ‘‘भारत आणि रशियाने भूराजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नावीन्यपूर्ण दृष्टिकोन अवलंबणे आवश्यक आहे,’’ असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणावाचे वातावरण आहे.