esakal | भारत संगीतविश्‍वाने सुरेल आवाज गमावला;युवा गायकांचे प्रेरणास्रोत 
sakal

बोलून बातमी शोधा

SP-Balasubramaniam

आपल्या सुरांप्रमाणेच आपल्या साध्या सरळ व्यक्तिमत्वामुळे त्यांनी संगीत रसिकांवर अमीट ठसा उमटविला, अशा शब्दांत मान्यवरांनी बालसुब्रमण्यम यांना आदरांजली वाहिली.

भारत संगीतविश्‍वाने सुरेल आवाज गमावला;युवा गायकांचे प्रेरणास्रोत 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - विख्यात गायक, संगीतकार एस पी बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्‍वाने एक अत्यंत सुरेल आवाज गमावला आहे. आपल्या सुरांप्रमाणेच आपल्या साध्या सरळ व्यक्तिमत्वामुळे त्यांनी संगीत रसिकांवर अमीट ठसा उमटविला, अशा शब्दांत मान्यवरांनी बालसुब्रमण्यम यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आदींनी त्यांना आदरांजली वाहिली. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद: आपल्या चाहत्यांत ‘पादुमनिला' म्हणजे ‘सुरेल चंद्रमा’ या नावाने प्रसिद्ध असलेले बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने भारतीय संगीताने एक अत्यंत सुरेल गायक गमावला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू: बालसुब्रमण्यम व मी एकाच नेल्लोर गावचे मूळ रहिवासी होतो. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मला व्यक्तिशः दुःख झाले आहे. ते अनेक युवा गायकांचे प्रेरणास्रोत व मार्गदर्शक होते. त्यांनी गायलेली गीते भारतीयांच्या सदैव स्मरणात राहातील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी : बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने भारतीय सांस्कृतिक विश्‍वाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी आपल्या गाण्यांनी अनेक दशके घराघरांतील चाहते मंत्रमुग्ध झाले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गृहमंत्री अमित शहा : सुरेल आवाज व अद्वितीय संगीत रचनांमुळे बालसुब्रमण्यम हे संगीत रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. 

माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर : देशाने एक मधुर गायक गमावला आहे. त्यांचे निधन ही प्रत्येक कानसेनासाठी दुःखद वार्ता आहे. 

बालसुब्रमण्यम यांची काही गाजलेली गीते 
- तेरे मेरे बीच मै 
- हम तुम दोनो जब मिल जायेंगे 
- आजा शाम होने आयी 
- दिल दिवाना बीन सजना के 
- दीदी तेरा देवर दिवाना 
- रोझा जानेमन 
- कबुतर जा जा जा 
- पहेला पहेला प्यार है 
- आके तेरी बाहों मे 
- मै तो दिवानी हुई 
- देखा है पहेली बार 
- वाह वाह रामजी 
- ओ मारिया