PM मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक! तुमचं अकाउंट कसं ठेवाल सुरक्षित?

Twitter
TwitterSakal

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाउंट हॅक (PM Modi Twitter Account Hacked) करण्यात आलं. याबाबत पीएमओ कार्यालयाकडून (PMO Office) माहिती देण्यात आली आहे. हॅक झालेल्या वेळेत मोदींच्या अकाउंटवरून कुठलंही ट्विट केलं असेल त्याकडे दुर्लक्ष करा, असा सांगण्यात आलं आहे. असा अनुभव कोणालाही येऊ शकतो म्हणूम आपण आज इतर Twitter खातेधारकांनी त्यांचे खाते सुरक्षित करण्यासाठी काय करावे? तुमचे Twitter खाते कसे सुरक्षित ठेवावे ते आज आपण जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही Twitter वापरत असाल तर तुमचा पासवर्ड नेहमी स्ट्रॉंग असणे आवश्यक आहे, त्यासोबतच टू स्टेप व्हेरिफिकेशन देखील वापरा. आपले अकाउंट हॅक झाले आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर अकाउंटमधून तुमच्या व्यतिरिक्त कोणतीही अनपेक्षित ट्विट, रिट्विट, लाइक करताना आढळल्यास त्याबद्दल तात्काळ उपाय करणे आवश्यक असते.

खाते हॅक कसे होते?

Twitter नुसार, जर तुम्ही तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरुण जर तुम्ही एखाद्या थर्डपाट्री ऍप्लिकेशन किंवा वेबसाइटवर लॉग इन केले. तसेच जर तुमचा पासवर्ड हा पुरेसा स्ट्रॉंग नसेल, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस किंवा मालवेअर आले असतील आणि त्यामुळे तुमचा पासवर्ड चोरी झाला असल्यास, किंवा जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणचे इंटरनेट वापरत असाल तर तुमचे अकाऊंट हॅक होण्याचा धोका असतो.

Twitter
येतोय 1TB स्टोरेज असलेला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या अपेक्षित किंमत

अकाउंट हॅक झाले आहे का कसे ओलखावे?

तुमच्या ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल? अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? हे सर्व प्रश्न तुमच्या मनात येत असतील, जर तुमचे खाते हॅक झाले असेल परंतु तरीही तुम्ही लॉग इन करू शकत असाल तर तुम्ही तुमचे खाते सुरक्षित करण्यासाठी आणि काही गंभीर प्रकार रोखण्यासाठी पुढील गोष्टी करु शकता.

  • तुमच्या खात्याद्वारे अनपेक्षित ट्विट केले गेले आहे का?

  • तुमच्या खात्यातून पाठवलेले डायरेक्ट मेसेज पाठवण्यात आले आहेत का?

  • अकाउंटवरुन झालेली अॅक्टिव्हीटी तपासून पाहा, एखाद्या अनपेक्षित व्यक्तिला फॉलो करणे, अनफॉलो करणे किंवा ब्लॉक करणे इत्यादी काही घडले आहे काय़

  • आपल्या खाते हॅक केले जाऊ शकते असे नोटिफीकेशन Twitter कडून मिळाले तर

  • तुमच्या अकाऊंटची माहिती बदलली गेली आहे असे नोटिफीकेशन Twitter कडून मिळाले तर..

  • तुमचा पासवर्ड काम करत नसेल आणि तुम्हाला तो रीसेट करण्यासाठी नोटीफिकेशन मिळत असेल तर

तुमच्या Twitter खात्यावर वरीलपैकी काहीही घडताना तुमच्या लक्षात आले असेल, तर तुमच्या Twitter खाते हॅक झाले असण्याची शक्यता आहे.

Twitter
पंतप्रधान मोदींचं Twitter अकाउंट हॅक; सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

अकाउंटचा पासवर्ड बदला

तुम्हाला सेटिंग्जमधील पासवर्ड टॅबमधून तुमचा पासवर्ड त्वरित बदलण्याचा सल्ला दिला जातो. तुम्‍ही लॉग आउट झाल्‍यास, लॉगिन वर जा आणि तुमचा पासवर्ड रीसेट करण्‍यासाठी फॉरगॉट पासवर्ड यावर क्लिक करा. त्यानंतर पुर्वी कधीही न वापरलेला स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करा. तुम्ही लॉग इन करू शकत नसल्यास, तुमचे खाते हॅक झाले असण्याची शक्यता आहे.

ईमेल अड्रेस बदला

तुमच्या अकाऊंटला जोडलेला ईमेल सुरक्षित असल्याची खात्री करा आणि त्याचा अॅक्सेस असलेले तुम्ही एकमेव आहात का हे तपासा. तुम्ही तुमच्या Twitter अॅपवरून किंवा twitter.com वर लॉग इन करा त्यानंतर अकाऊंट सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचा ईमेल पत्ता बदलू शकता.

थर्ड पार्टी अॅप एक्सेस काढा

लॉग इन केलेले असताना, तुमच्या मोबाईल सेटिंग्जमध्ये अॅप्स मध्ये जा आणि तुम्ही इंस्टॉल केले नसलेले सर्व थर्ड पार्टी अॅप एक्सेस काढून.

पासवर्ड अपडेट करा

जर इतर थर्ड पार्टी एप्लिकेशनमध्ये तुमचा ट्विटर पासवर्ड वापरत असाल तर त्या एप्लिकेशनमध्ये तुमचा पासवर्ड अपडेट करायला विसरु नका. अन्याथा अनेक वेळा लॉगिन केल्याने तुमचे अकाऊंट काही काळासाठी लॉक केले जाऊ शकते.

वर दिलेल्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमचे अकाउंट सुरक्षित होईल आणि तुमचे अकाउंट इतर कोणी वापरु शकणार नाही.

Twitter
जिओने पुन्हा लाँच केले 5 नवे प्लॅन; वाचा काय आहेत बेनिफिट्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com