काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! राजस्थानच्या CM पदासाठी नेतृत्वाचा 'या' नेत्याला पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi, Sonia Gandhi

काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! राजस्थानच्या CM पदासाठी नेतृत्वाचा 'या' नेत्याला पाठिंबा

नवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसने सचिन पायलट यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पायलट लवकरच राजस्थानचे नवे मुख्यमंत्री बनू शकतात. पक्षाच्या या निर्णयानंतर आता अशी अटकळ बांधली जात असताना काँग्रेस पक्षाने अशोक गेहलोत यांना पक्षाचे नवे अध्यक्ष बनवण्याचे ठरवल्याचं दिसत आहे. (Congress news in Marathi)

हेही वाचा: Narayan Rane : उद्धव जगातला सर्वात 'ढ' माणूस; केंद्रीयमंत्री राणेंची संतप्त टीका

काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला असून राहुल गांधी भारत जोडो यात्रा अर्ध्यात सोडून आज रात्री दिल्लीत परतणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते दिल्लीत पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांना भेटू शकतात. यासोबतच काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीबाबत पक्षश्रेष्ठींशीही बोलू शकतात.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. या सगळ्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह खासदार शशी थरूर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी हेही पक्षाच्या सर्वोच्च पदाच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: आमच्या बंडाची ३३ देशांनी दखल घेतली; CM शिंदेंनी ठाकरेंना दिलेलं प्रत्युत्तर चर्चेत

दुसरीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भारत दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधी यांनी आज काँग्रेसमध्ये 'वन मॅन, वन पोस्ट'ला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्षपदाची कमान मिळाल्यास मुख्यमंत्रीपदी राहता येणार नाही.

Web Title: Sachin Pilot Gets Support From Congress Leadership For Rajasthan Cm Say Sources

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..