आमच्या बंडाची ३३ देशांनी दखल घेतली; CM शिंदेंनी ठाकरेंना दिलेलं प्रत्युत्तर चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Eknath Shinde

आमच्या बंडाची ३३ देशांनी दखल घेतली; CM शिंदेंनी ठाकरेंना दिलेलं प्रत्युत्तर चर्चेत

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर प्रथमच जाहीर सभेतून संबोधीत केले. यावेळी त्यांनी मुंबईसह शिवसैनिकांना नवसंजीवनी देणारे भाषण करत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्ष सज्ज असल्याचं बोलून दाखवलं. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. मात्र शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या सभेवर दिलेलं प्रत्युत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. (Eknath Shinde news in Marathi))

हेही वाचा: Uddhav Thackeray : मुलं पळवणारे होते, आता बाप पळवणारे आलेत; ठाकरी तोफ धडाडली

उध्दव ठाकरे आपल्या सभेत म्हणाले होते की, व्यासपीठावर आल्यानंतर आधी आमचे वडील आहेत, का जागेवर ते पाहिलं. आतापर्यंत मुलं पळवणारे पाहिले होते. आता बाप पळवणारेही आल्याची जहरी टीका उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली होती.

या व्यतिरिक्त उद्धव म्हणाले की, नोकऱ्या चालल्या आहेत, वेदांत गेला त्याच्याबद्दल धांदात खोटे बोलत आहेत. तो प्रकल्प पुन्हा आणा. एकेक उद्योग निघून जाताहेत. मिंधे फक्त शेपट्या हलवून होय महाराजा म्हणत आहेत. महाराष्ट्राची बाजू घेऊन दिल्लीत का बोलत नाही. सांगा की पंतप्रधानांना हा प्रकल्प कसा काय गेला, म्हणजे हे अगोदरच ठरले होते. महापालिका जिंकण्यासाठी हा विषय नाही, असही उद्धव यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा: Uddhav Thackeray : ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेला 'मुन्नाभाई' कोण? वाचा सविस्तर

दरम्यान दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला प्रत्युत्तर दिल होतं. आम्ही मिंधे नाही तर बाळासाहेबांचे खंदे समर्थक आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाचे कौतुक करत आम्ही केलेल्या बंडाची दखल जगातिक पातळीवरील ३३ देशांनी घेतल्याचं शिंदे म्हणाले होते. शिंदे यांच्या या विधानाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Web Title: Eknath Shinde Reply To Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..