काँग्रेसला झटका? सचिन पायलट भाजपमध्ये; काँग्रेस नेत्याची माहिती

Sachin Pilot is now in BJP says Chattisgarh Congress In-charge PL Punia
Sachin Pilot is now in BJP says Chattisgarh Congress In-charge PL Punia

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वाढली असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे भाजपमध्ये असल्याचे धक्कादायक विधान काँग्रेस नेते आणि छत्तीसगढचे प्रभारी पी एल पुनिया यांनी म्हटले आहे. पायलट हे भारतीय जनता पक्षात असून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना कशी वागणूक मिळते हे सर्वांना माहित असल्याचेही पुनिया यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काँग्रेसमध्ये सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान होतो. त्या पद्धतीने भाजपमध्ये काय परिस्थिती असते हे सर्वांना माहित आहे असेही पुनिया यांनी म्हटले आहे. मात्र, एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार सचिन पायलट यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे वृत्ताचे खंडन केले आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारसमोर अडचणी उभ्या ठाकल्या असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे त्यांच्यासोबत ३० आमदार असल्याचा दावा करत असून ते ३० आमदारांसह भाजपमध्ये जातील, अशी चर्चा सुरू आहे. तसेच, सचिन पायलट यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृतरित्या माहिती मिळू शकली नाही. 
-----------------
राजस्थानात सत्ताबदल झाल्यास मायावतींना होणार सर्वाधिक आनंद 
------------------
काँग्रेसची मध्यरात्री अडीच वाजता पत्रकार परिषद; केला 'हा' मोठा दावा
------------------

सचिन पायलट यांनी रविवारी दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची भेट घेतली खरी, पण त्यानंतर ते अलीकडेच भाजपमध्ये सहभागी झालेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांचीही भेट घेतली. ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सचिन पायलट यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर एक ट्वीट केले. मित्राच्या सध्याच्या स्थितीवर दया येते, मुख्यमंत्री गेहलोत सचिन पायलट यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसमध्ये कर्तृत्व आणि क्षमता यांना प्राधान्य दिले जात नाही अशा स्वरुपाचे हे ट्वीट आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट एक पर्याय म्हणून भाजपशी चर्चा करत आहेत. भाजपने बाहेरुन पाठिंबा देण्याची तयारी दाखवली तर निवडक आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सचिन पायलट करत आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर सचिन पायलट मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com