काँग्रेसचे नेतृत्व सचिन पायलटकडे द्या: चेतन भगत

धनंजय बिजले
शुक्रवार, 7 जून 2019

चेनत भगत नुसतं नाव जरी घेतलं तरी तरूणाईचे कान टवकारतात. सध्याच्या घडीला "यूथ आयकॉन' हे बिरूद फार कमी लेखकांना लागू पडते. त्यात चेतनचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

राहुल गांधीनी काँग्रेस अध्यक्षपद सोडल्याशिवाय काँग्रेस पक्ष सशक्त होणार नाही आणि देशाला भक्कम विरोधी पक्ष मिळणार नाही, असा परखड सल्ला तरूणाईचा आवडता लेखक चेनत भगतने दिला आहे. सचिन पायलटसारख्या हुशार, तरूणाकडे पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे, असे स्पष्ट मतही त्याने 'सकाळ'ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केले आहे.  

चेनत भगत नुसतं नाव जरी घेतलं तरी तरूणाईचे कान टवकारतात. सध्याच्या घडीला "यूथ आयकॉन' हे बिरूद फार कमी लेखकांना लागू पडते. त्यात चेतनचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्याच्या पुस्तकांचा एकूण खप सत्तर लाखांहून अधिक आहे. चेतनच्या व्टिटर फालोअर्सची संख्या तब्बल बारा लाख आहे तर इन्साटवर चार लाख जण त्याला फॉलो करतात. इतकी माहिती त्याच्या लोकप्रियतेची साक्ष पटण्यास पुरेशी आहे.

लोकशाही देशात विरोधी पक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे, असे लेखक म्हणून मला मनापासून वाटते, असे सांगत चेतन भगत या मुलाखतीत म्हणतो. काँग्रेस देशातील मोठा पक्ष आहे. त्यामुळे तो वाढणे गरजेचे आहे. पण त्यासाठी काँग्रेसनेही तत्काळ पावले टाकली पाहिजेत. सर्वप्रथम राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडले पाहिजे. त्यांना आता पुरेशी संधी देवून झाली आहे. राहुल यांना आणखी संधी देणे योग्य नाही. राहुलना प्रियांका गांधी यादेखील पर्याय होवू शकत नाही. त्यापेक्षा सचिन पायलटसारखा कार्यक्षम नेता पक्षाकडे आहे. सचिन पायलटसारख्या हुशार तरूण नेत्याकडे पक्षाने आता सारी सूत्रे सोपवायला हवीत.

भारतीय लेखक थेट राजकीय भूमीका घेत नाहीत, अशी ओरड सातत्याने केली जाते. त्याला चेतन भगतने या मुलाखतीत छेद दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याबाबतही त्याने आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत.

(सविस्तर मुलाखत वाचा रविवारच्या सकाळमध्ये)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Pilot should lead Congress instead of Rahul Gandhi says Chetan Bhagat