
ICC World Cup: वर्ल्ड कप २०२३साठी सचिन तेंडुलकरवर मोठी जबाबदारी, ग्लोबल अॅम्बेसिडर म्हणून निवड
Sachin Tendulkar Global Ambassador: यंदाचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक भारतात आयोजित कऱण्यात आला आहे. हा विश्वचषक भारताने जिंकावा अशी प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. काही दिवसांपुर्वी आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीची भारताती काही शहरांमध्ये मिरवणुक देखील काढण्यात आली होती. भारतात आयोजित कऱण्यात आलेला हा विश्वचषक महत्वाचा असणार आहे. आयसीसी विश्वचषक २०२३साठी ग्लोबल अॅम्बेसिडर म्हणून सचिन तेंडुलकरची निवड कऱण्यात आली आहे.
सचिन तेंडुकरला क्रिकेटचा देव म्हणूनही ओळखलं जातं. त्याने भारतासाठी अनेक चांगले डाव खेळून भारतासाठी विजयश्री खेचून आणली आहे. विश्वचषकामध्ये त्याने भारतासाठी ६ शतकं झळकावली तर पूर्ण कारकीर्दीत १०० आतंरराष्ट्रीय शतकं झळकवण्याचा विश्व विक्रम केला होता. जो आजही अबाधित आहे.
भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना ८ ऑक्टोबर या दिवशी खेळवला जाईल.