नर्सच्या प्रेमात बुडालेले मुख्यमंत्री; अशी होती मुलायमसिंह-साधना यांची लव्हस्टोरी

नर्सच्या प्रेमात बुडालेले मुख्यमंत्री; अशी होती मुलायमसिंह-साधना यांची लव्हस्टोरी

लखनौ - समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे शनिवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात निधन झाले. साधना गुप्ता यांच्यावर आज लखनऊमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. मुलायम सिंह यादव यांच्या पहिल्या पत्नी आणि अखिलेश यादव यांच्या आई मालती देवी यांचे 2003 मध्ये निधन झाले होते. मालती देवी यांच्या निधनानंतरच मुलायम सिंह यादव यांनी साधना गुप्ता यांना पत्नीचा दर्जा दिला होता. दोघांची लव्हस्टोरी रंजक आहे. (Sadhna Gupta and Mulayam Singh Yadav love story)

नर्सच्या प्रेमात बुडालेले मुख्यमंत्री; अशी होती मुलायमसिंह-साधना यांची लव्हस्टोरी
VIDEO : दाजींचा नादच खुळा; दमलेल्या वारकऱ्यांसाठी दानवेंनी स्वत: बनवला चहा

मुलामय सिंह यादव यांनी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात साधना गुप्ता यांना पत्नी आणि प्रतीक आपला मुलगा असल्याचे म्हटले होते. साधना गुप्त यांचा आधीच विवाह झालेला होता. 4 जुलै 1986 मध्ये फारुखाबादच्या चंद्रप्रकाश गुप्ता यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. मात्र लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.

आईच्या आजारपणात वाढली दोघांमध्ये जवळीक

साधना गुप्ता आणि मुलायम सिंह यादव यांच्यात मुलायम सिंह यांच्या आई रुग्णालयात दाखल असताना जवळीक वाढली होती. साधना गुप्ता याच रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. साधना गुप्ता यांनी मुलायम सिंह यादव यांच्या आई मूर्तीदेवी यांची खूप सेवा केली. मूर्तीदेवी यांना चुकीचे इंजेक्शन दिले जात असताना साधना गुप्ता यांनी थांबवलं होतं. तेव्हापासून मुलायमसिंह यादव हे साधना यांच्या प्रेमात पडले होते.

दरम्यान साधना गुप्ता 1988 मध्ये आपल्या पतीपासून विभक्त झाल्या आणि पुढच्याच वर्षी मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून मुलायमसिंह यादव साधना गुप्ता यांना स्वतःसाठी भाग्यवान मानू लागले. त्यानंतर मुलायम सिंह यादव आणि साधना गुप्ता एकत्र आले. 2007 मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्यामुळे साधना गुप्ता आणि मुलायम सिंह यादव यांच्यातील संबंध उघड झाले होते. यामध्ये त्यांनी साधना गुप्ता आपली पत्नी आणि प्रतीक आपला मुलगा असल्याचं म्हटलं होतं.

2003 मध्ये मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी मालती देवी यांचं निधन झालं. त्यानंतरच त्यांनी साधना गुप्ता यांना आपल्या पत्नीचा दर्जा दिला. त्यावेळी अखिलेश यादव विद्यार्थी होते. 1982 ते 1988 पर्यंत मुलायम सिंह यादव आणि साधना गुप्ता यांच्या नात्याचे रहस्य फक्त एकाच व्यक्तीला माहित होते. ते अमरसिंह होते. अमरसिंह यांना सर्व माहीत होते, पण ते मुलायमसिंह यांच्या पत्नी मालती यादव आणि मुलगा अखिलेश यांच्यामुळे गप्प राहिले.

नर्सच्या प्रेमात बुडालेले मुख्यमंत्री; अशी होती मुलायमसिंह-साधना यांची लव्हस्टोरी
बायकोला घाबरुन पासपोर्टची पानं फाडली; थायलंड ट्रीप लपवणं पडलं महागात

साधना यांचे अखिलेश यांच्यासोबत होते मतभेद

2016 मध्ये समाजवादी पक्षाचे तत्कालीन प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्या घरात कलह निर्माण झाला. अखिलेश यांनी साधना गुप्ता यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्याला साधना यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. साधना यादव यांनी शिवपाल यादव यांची बाजू घेत शिवापाल यांनी गरिबी पाहिली आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा, असं म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com