
मालेगाव बॉम्बस्फोटात प्रकरणात माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने १७ वर्षांनंतर हा महत्वाचा निकाल दिला. या खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा या २०१९ मध्ये भोपाळमधून खासदार म्हणून निवडून आल्या, मात्र त्यांना काही दिवसांतच पंतप्रधान मोदींच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. "मी त्यांना कधीच मनापासून माफ करणार नाही," असं मोदींनी जाहीरपणे सांगितले होते. परिणामी साध्वी प्रज्ञासिंह यांना २०२४ मध्ये खासदारकीचे तिकिट मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांच्या राजकारणीतील करियरला ब्रेक लागल्याची चर्चा सुरु झाली होती.