फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिली 'ही' वेळ

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्याच्या निर्णयासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.23) मोठा निर्णय दिला आहे. फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे न्यायालयाकडून पूर्णपणे बंदी लागू करण्यात आलेली नाही. फटाके फोडण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने वेळ ठरवून दिली आहे. दिवाळीच्या सणात रात्री केवळ 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत. 

नवी दिल्ली- फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्याच्या निर्णयासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आज (ता.23) मोठा निर्णय दिला आहे. फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे न्यायालयाकडून पूर्णपणे बंदी लागू करण्यात आलेली नाही. फटाके फोडण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने वेळ ठरवून दिली आहे. दिवाळीच्या सणात रात्री केवळ 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार लोकांना आता केवळ दोनच तास नागरिकांना फटाके फोडण्यासाठी वेळ मिळणार आहे अन्य वेळेत नागरिकांना न्यायालयाच्या निर्णयानुसार फटाके फोडता येणार नाहीत. त्याचबरोबर, नाताळ आणि नवीन वर्षासाठी नागरिकांना रात्री 11.55 ते 12.30 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार आहेत. नाताळ आणि नवीन वर्षासाठी नागरिकांना फटाके फोडण्यासाठी केवळ 35 मिनीटांचा कालावधी देण्यात आला आहे.

परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाइन फटाके विक्रीवर बंदी लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशभरात सरसकट फटाके विक्रीच्या बंदीला नकार दिला आहे. मात्र, कमी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांचीच विक्री केली जावी असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर फटाक्यांची ऑनलाइन विक्री करण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना फटाके विक्री करता येणार नाही.

Web Title: Safer Firecrackers Allowed From 8 To 10 pm On Diwali By Supreme Court