नवी दिल्ली : सहारा समूहाशी संबंधित हवाला व्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लोणावळा येथील ‘अँबी व्हॅली’ सिटी जप्त केली आहे. साधारपणे ७०७ एकर जागेत पसरलेल्या या शहराची अंदाजित किंमत सुमारे १ हजार ४६० कोटी रुपये इतकी आहे. .हवाला प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार ‘ईडी’च्या कोलकता विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप सहारा समूहावर आहे. त्या अनुषंगाने या समूहावर कारवाई सुरू आहे.सहारा समूहातील विविध कंपन्यांचा पैसा इतरत्र वळविताना बेनामी पद्धतीने ‘अँबी व्हॅली’ तसेच त्याच्या आसपासच्या जमिनी खरेदी करण्यात आल्याचे तपास संस्थांचे म्हणणे आहे. सहारा समूहातील कंपन्या आणि या कंपन्यांत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात अनेक राज्यांत गुन्हे दाखल आहेत. ओडिशा, बिहार आणि राजस्थान पोलिसांकडे दाखल केलेल्या गुन्ह्यांची दखल घेत ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पोलिसांकडे नोंद असलेल्या गुन्ह्यांपैकी सुमारे तीनशे गुन्हे हवाला प्रतिबंधक कायद्याशी (पीएमएलए) संबंधित असल्यामुळे ‘ईडी’ने तपासाला गती दिली होती. सहारा समूहाने विविध कंपन्यांमार्फत देशव्यापी ''पोन्झी'' योजना चालविली होती याद्वारे गुंतवणुकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले होते..गुंतवणूकदारांकडून तक्रारीठेवीदार तसेच एजंटना जास्त परतावा आणि कमिशनचे आमिष दाखवून असंघटितपणे लोकांकडून पैसे जमा करणे, मॅच्युरिटी झाल्यानंतरही वेळेवर पैसे परत न करणे, मॅच्युरिटी झाल्यानंतर जबरदस्तीने पैसा अन्य योजनांत वळविणे, परतावा द्यावा लागू नये म्हणून त्रुटी काढणे आदी स्वरूपाच्या तक्रारी गुंतवणुकदारांनी पोलिसांकडे केल्या होत्या. विद्यमान देणी असताना देखील फेर-गुंतवणुकीला नवीन गुंतवणूक म्हणून दाखवत सहारा समूह लोकांकडून पैसा जमा करतच होता, असे ‘ईडी’कडून सांगण्यात आले होते. जनतेकडून जमवलेला पैसा खासगी खर्चासाठी वापरण्यात आला तसेच बेनामी नावाने या पैशातून ठिकठिकाणी संपत्ती खरेदी करण्यात आली होती. अनेक मालमत्ता रोख स्वरूपात विकण्यात आल्या होत्या त्याचे रेकॉर्डही ठेवण्यात आले नव्हते, असे ‘ईडी’च्या तपासात आढळून आले होते..या कंपन्यांकडून घेतले पैसेज्या कंपन्यांमार्फत ‘सहारा’ने सर्वसामान्यांकडून पैसा गोळा केला होता, त्यात हमारा इंडिया क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., सहारा क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., सहारायन युनिव्हर्सल मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, स्टार्स मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि., सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लि., सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट्स कॉर्पोरेशन लि. आणि सहारा इंडिया कमर्शिअल कॉर्पोरेशन लि. यांचा समावेश होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.