श्रद्धापेक्षाही भयानक! बायकोच्या शरीराचे तुकडे करुन कुत्र्यांना खायला घातले|Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News: श्रद्धापेक्षाही भयानक! बायकोच्या शरीराचे तुकडे करुन कुत्र्यांना खायला घातले

Sahibganj Rubika pahadin Murder Case: आफताबनं त्याची प्रियसी श्रद्धाची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे करुन ते जंगलात फेकून दिले होते. त्यानंच पोलिसांना दिलेल्या जवाबात हे सांगितलं होतं. या घटनेनंतर आणखी एका प्रकरणानं देशाला हादरवून सोडले आहे. ती घटना कुणालाही सुन्न करणारी अशीच आहे.

आफताब नंतर आता दिलदार नावाच्या सणकी व्यक्तीचे घृणास्पद आणि तितकेच किळसवाणे कृत्य समोर आले आहे. नाव भलेही दिलदार असेल मात्र त्यानं केलेली कृती ही इतकी अमानुष आहे की त्यामुळे कुणालाही त्याच्याविषयी चीड आल्याशिवाय राहणार नाही. देशभरात त्या दिलदारच्या कृत्यावर सोशल मीडियातून तीव्रपणे विरोध केला जात आहे. त्यानं केलेल्या त्या गुन्ह्याबद्दल त्याला तातडीनं शिक्षा करण्यात यावी. अशी मागणी नेटकरी करु लागले आहेत.

हेही वाचा: Viral News : भिकारीच्या खिशातून निघाले चक्क साडे तीन लाख रुपये, पोलिस पाहून चक्रावले

झारखंडमध्ये घडलेल्या त्या हत्याकांडानं आपले डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. झारखंडमधील साहिबगंज येथे राहणाऱ्या बोरिया संथालीमधील अंगणवाडी केंद्राच्या मागील जागेत मानवी शरीराचे तुकडे आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. एका महिलेच्या पायाचे तुकडे कुत्रे खात असल्याचे काही नागरिकांना दिसून आले होते. त्यावेळी त्यांनी तातडीनं पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर जी माहिती समोर आली त्यानं धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात मृत महिलेचा पती दिलदार अन्सारीला अटक केली आहे. त्यानं आपल्या २२ वर्षीय पत्नीला रबिका पहाडिन हिचा कटरच्या साह्यानं खून केला. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्यानंतर त्यानं जे केलं की, हे कमालीचे अमानुष होते. त्यानं कटरच्या साह्यानं पत्नीच्या शरीराचे तुकडे करुन ते कुत्र्यांना खाण्यास टाकले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रबिरा ही गोंडा पहाड येथे राहणारी होती. तिचं लग्न दिलदार अन्सारीशी झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्यात भांडणे सुरु झाली. रागाच्या भरात त्यानं पत्नीची एका इलेक्ट्रीक कटरनं हत्या केली. आणि त्याचे तुकडे केले. ते तुकडे अंगणवाडीच्या पाठीमागे टाकून दिले.

हेही वाचा: Viral Video: लेकीची माया! दृष्टीहीन आई-वडिलांना मदत करणाऱ्या लेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

रबिका ही दिलदारची दुसरी पत्नी होती. अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या अंगणवाडीच्या पाठीमागे स्थानिक नागरिकांना त्या महिलेच्या तुकड्यांना कुत्रे खात होते. त्यांनी तातडीनं पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी मोठया संख्येनं घटनास्थळी धाव घेत तो परिसर सील करुन टाकत वेगानं तपासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा: Viral Video : 'कल के हसीन मुलाकात के लिए; या बापलेकीच्या गाण्याने घातलाय धुमाकूळ

दिल्लीमध्ये झालेल्या आफताबच्या घटनेनंतर आता दिलदारच्या घटनेनं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्याच जवळच्या व्यक्तीची इतक्या अमानुष पद्धतीनं हत्या करणाऱ्या अशा नराधमांविरोधात तातडीनं कारवाई करण्यात यावी. असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावयर दिसून येत आहे.