Delhi Murder : आधी चाकूने भोकसलं, नंतर दगडाने ठेचलं; प्रेयसीची निर्घृण हत्या करणारा नराधम अटकेत | 16-year-old girl murder case in Delhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sahil accused of the 16-year-old girl murder case in Delhi has been arrested

Delhi Murder : १६ वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या करणारा 'तो' नराधम अखेर अटकेत

दिल्ली रविवारी रात्री एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची चाकूने वार करत हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. हादरवून सोडणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान प्रकरणातील आरोपी साहिल याला पोलिसांनी अटक केली आहे.

बुलंदशहर येथून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीने त्याच्या १६ वर्षीय प्रेयसीवर ४० वार केले होते. इतकं करून देखील त्याचं समाधान न झाल्याने त्यांने दगडाने तरूणीचं डोकं ठेचलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी एडीसीपी, आउटर नॉर्थ राजा बंथिया यांनी सांगितलं की मुलगी रस्त्याने जात असताना तिच्यावर हा हल्ला करण्यात आला. आरोपीने तिला रस्त्यात अडवलं आणि चाकूने तिच्यावर हल्ला केला. हे दोघे एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांची ओळख किती जुनी होती याबद्दल चौकशी सुरू आहे. या घटनेच्या तपासासाठी ६ टीम नियुक्त करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितलं.

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि शनिवारी त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. रविवारी ही मुलगी तिच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना वाटेत मुलाने तिला अडवून तिच्यावर हल्ला केला. शवविच्छेदनानंतरच त्याच्यावर किती वेळा वार करण्यात आला हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून शाहबाद डेअरी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला आयोगाने घेतली दखल

दिल्ली महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, इतके भयावह प्रकरण मी पाहिलेले नाही. दिल्ली महिला आणि मुलींसाठी अत्यंत असुरक्षित आणि असंवेदनशील आहे. ज्या दिवशी या देशाची पोलीस व्यवस्था सुधारेल, त्यादिवशी कोणत्याही स्त्री किंवा मुलीविरुद्ध काहीही करण्याची हिंमत कुणाला होणार नाही. आज जे काही घडत आहे ते पूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्थेचे अपयश दर्शवते.

टॅग्स :Crime Newsdelhi