

Sai Jadhav, the first woman lieutenant of the Territorial Army after 93 years, proudly representing Maharashtra and making history in Indian defence forces.
esakal
Sai Jadhav Territorial Army woman officer : देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मध्ये यावर्षी एक ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला. ९३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, एका महिला ऑफिसर कॅडेटने या प्रतिष्ठित संस्थेत यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अभिमानाची बाब म्हणजे हा सन्मान महाराष्ट्राची कन्या असणाऱ्या कोल्हापूर येथील रहिवासी सई जाधव हिने मिळवला आहे.
सई जाधव हिने प्रादेशिक सैन्याच्या विशेष अभ्यासक्रमांतर्गत कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि आता ती लेफ्टनंट बनली आहे. सई जाधव हिची कामगिरी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षा आणि SSB मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर सई जाधवची निवड झाली होती. तिने IMA मध्ये सहा महिन्यांचे आव्हानात्मक लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही कठीण होते.
सई जाधवचे कुटुंब दीर्घकाळापासून देशसेवेशी जोडलेले आहे. तिचे वडील संदीप जाधव हे भारतीय सैन्यात मेजर आहेत. तिचे आजोबा ब्रिटिश सैन्यात सेवा बजावत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.