Sajjan Kumar Sentenced to Life Imprisonment : काँग्रेसचे माजी नेते तथा १९८४ च्या शिख दंगली प्रकरणातील दोषी सज्जन कुमारला पुन्हा एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरस्वती विहार हिंसाचार प्रकरणात दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. सज्जन कुमारने १९८४ मधील शिख दंगलीदरम्यान सरस्वती विहारमधील एका पित्रा पुत्राला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. यातच दोघांचाही मृत्यू झाला होता.