esakal | Sakalchya Batmya: सकाळचं आजचा पॉडकास्ट ऐकला का ?
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast main.jpeg

आता बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंदही सकाळ आपल्या पॉडकास्टवरुन देणार आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सकाळने श्रोत्यांच्या हक्काचे पॉडकास्ट सुरु केले आहे.

Sakalchya Batmya: सकाळचं आजचा पॉडकास्ट ऐकला का ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सकाळ आपल्या वाचकांसाठी नवी पर्वणी देत आहे. आता बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंदही सकाळ आपल्या पॉडकास्टवरुन देणार आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सकाळने श्रोत्यांच्या हक्काचे पॉडकास्ट सुरु केले आहे. रोज सकाळी आपल्या ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर ऐकायला मिळणार आहेत. त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही ऐकायला मिळणार आहे. दररोज सकाळी हे पॉडकास्ट लाइव्ह होणार आहे. 

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहिती असणं गरजेचं झालं आहे. अमूक एखाद्या विषयाची माहिती हवी असं पूर्वीसारखं कोणतं बंधनं राहिलं नाही. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोलमुळे खिसा रिकामा होणार याच्या जोडीला जगात काय चाललयं याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट'वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. यासाठी श्रोत्यांना खाली दिलेल्या लिंकवर जाऊन सकाळच्या बातम्या या पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल. 

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com - https://bit.ly/3t9OZP0

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.
 

loading image
go to top