esakal | घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवून देणगी परत घ्यावी; साक्षी महाराज कडाडले
sakal

बोलून बातमी शोधा

'घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवून देणगी परत घ्यावी'

'घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवून देणगी परत घ्यावी'

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी आता राम मंदिर जमीन खरेदी प्रकरणावरुन केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. राम मंदिर खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्यांवर त्यांनी कडाडून टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, आरोप लावणाऱ्यांनी पावती दाखवून देणगीचे पैसे परत घ्यावे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह या प्रकरणी आरोप करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा: राम मंदिर जमीन घोटाळा : संजय सिंहांचा कोर्टात जाण्याचा इशारा

त्यांनी म्हटलंय की, ज्या पक्षाच्या प्रमुखाने कारसेवकांवर गोळ्या चालवल्या होत्या त्याचठिकाणी आज भव्य राममंदिर बनत आहे. हीच गोष्ट त्या लोकांच्या पचनी पडत नाहीये. पुढे त्यांनी असंही म्हटलंय की, राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी भगवान श्रीरामासाठी आपलं उभं आयुष्य समर्पित केलं आहे.

आणि अशा व्यक्तीवर आरोप लावणे सर्वस्वी चुकीचं आहे. उरली गोष्ट देणगीची तर आपचे खासदार संजय सिंह यांनी जितकी देणगी दिली असेल त्याचा हिशेब ते घेऊ शकतात अथवा पावती दाखवून ते आपली देणगी परत घेऊ शकतात. पुढे त्यांनी म्हटलंय की, अखिलेश यादव सारख्या व्यक्तीने आरोप केला आहे ते देखील पावती दाखवून देणगीचे पैसे परत घेऊ शकतात.

हेही वाचा: तर तुम्हालाही मिळू शकेल लोकल ट्रेनने प्रवास करण्याची सूट

साक्षी महाराजांनी पुढे म्हटलंय की, हे तेच लोक आहेत जे राम मंदिराचा विरोध करतात. ते म्हणायचे की राम मंदिराच्या नावावर अयोध्यामध्ये एक नवी वीट रचली जाऊ शकत नाही. आज त्याच अयोध्यामध्ये भगवान रामाचं भव्य आणि जगातील सर्वांत उत्कृष्ट असं मंदिर उभारलं जात आहे. त्यामुळेच यांची हालत खराब झाली आहे.

तर दुसरीकडे राम मंदिर निर्मिती प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळाप्रकरण उघड करणारे आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी आता हे प्रकरण कोर्टात घेऊन जाण्याचा इशारा दिला आहे. घोटाळा उघड केल्यानंतर तीन दिवसांनंतरही केंद्र सरकारनं याप्रकरणी कुठलीही कारवाई केली नाही, त्यामुळे आपण आता कोर्टात जाण्याची तयारी सुरु केल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top