Sakshi Murder Case : जो पहिल्यांदा सापडेल त्याला मारणार होता साहिल; 5 जणांची यादी होती तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sahil accused

Sakshi Murder Case : जो पहिल्यांदा सापडेल त्याला मारणार होता साहिल; 5 जणांची यादी होती तयार

New Delhi Murder Case : दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात साक्षी नावाच्या एका अल्पवयीन मुलीची निर्घूण हत्या करण्यात आली. खून करणाऱ्या माथेफिरूचं नाव साहिल आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातून अटक केली. याबाबत आणखी एक माहिती पुढे येत आहे.

साहिलच्या मर्डर लिस्टमध्ये पाच जणांची नावं असल्याचं समोर येत आहे. त्या दिवशी त्याच्या हाताला साक्षी लागली आणि त्याने तिचा जीव घेतला. यासंदर्भात पोलिस तपास करीत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी चाकू केला खरेदी

दिल्लीतील शहाबाद डेअरी भागात एका १६ वर्षीय तरुणीचा चाकूनं अनेक वार करत तसेच डोक्यात दगड घालून तरुणानं हत्या केली होती. या हत्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. प्रमुख आरोपी साहिलनं सांगितलं की, त्यानं १५ दिवसांपूर्वी हत्येसाठी वापरण्यात येणारा चाकू आठवडे बाजारातून खरेदी केला होता. पण हा चाकून त्यानं कुठून खरेदी केला हे सांगितलेलं नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

दरम्यान, साहिलच्या मर्डर लिस्टमध्ये असलेले इतर चौघे कोण होते, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलिस घटनेची कसून चौकशी करीत आहेत. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. साहिलने ज्या क्रूरतेने साक्षीची हत्या केली, त्याचा व्हीडिओ पाहाणंसुद्धा शक्य नाही. या प्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.

टॅग्स :Crime News