नव्या वर्षात पगार वाढणार? मोदी सरकार लवकरच करणार घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

modi

नव्या वर्षात पगार वाढणार? मोदी सरकार लवकरच करणार घोषणा

नवी दिल्ली : नव्या वर्षात मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जानेवारी 2021 पासून याचा लाभ मिळेल. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे

मोदी सरकारकडून नव्या वर्षाचे गिफ्ट

पुढील वर्षी जानेवारी 2022 पासून ही वाढ लागू केली जाऊ शकते. मोदी सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) मध्ये आणखी एक वाढ करू शकते. एचआरए वाढवण्याची घोषणाही सरकार लवकरच करू शकते. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) 31 टक्के करण्यात आला होता.

पॅरामीटर्सच्या आधारावर एचआरए

माहितीनुसार, घरभाडे भत्ता दरमहा किमान 5400 रुपये निश्चित करण्यात आलाय, जो यापेक्षा कमी असू शकत नाही. एचआरए हा पगाराचा केवळ एक भाग आहे, जो एखाद्या कंपनीकडून त्या शहरातील राहण्याचा खर्च लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना दिला जातो. कंपनी त्याची पगार रचना, पगाराची रक्कम आणि कर्मचारी ज्या शहरात राहतो, अशा पॅरामीटर्सच्या आधारावर HRA रक्कम अदा करायची ठरवते. शहर महाग असेल तर एचआरए जास्त असेल, शहर स्वस्त असेल तर एचआरए कमी असेल. HRA वाढवण्यामागील कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना खर्चात दिलासा देणे आहे.

हेही वाचा: नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क

प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला

सरकार एचआरए वाढवण्याची चर्चा करत आहे. वित्त मंत्रालयाने यासंदर्भात 11.56 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) लागू करण्याच्या मागणीवर विचार सुरू केलाय. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जानेवारी 2021 पासून एचआरए मिळेल. या कर्मचाऱ्यांना एचआरए मिळताच त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे. इंडियन रेल्वे टेक्निकल पर्यवेक्षक संघटना (IRTSA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेन (NFIR) यांनी 1 जानेवारी 2021 पासून HRA लागू करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: दोन वर्षानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद दिसणार नाही - नायब राज्यपाल

loading image
go to top