नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. “पाकिस्तानमध्ये मला घरासारखं वाटलं”, असे ते म्हणाले. तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणाने सर्वप्रथम शेजारी देशांवर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.