Sam Pitroda clarification : ''पाकिस्तानमध्ये मला घरासारखं वाटलं'' म्हणणाऱ्या सॅम पित्रोदांनी अखेर दिलं स्पष्टीकरण!

Sam Pitroda clarifies Pakistan remark : जाणून घ्या, सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या वक्तव्यावर वाद भडकल्यानंतर आता काय म्हटलंय?
Sam Pitroda addressing media after clarifying his Pakistan remark that stirred political controversy.

Sam Pitroda addressing media after clarifying his Pakistan remark that stirred political controversy.

esakal

Updated on

Sam Pitroda’s Pakistan remark sparks debate: काँग्रेस नेते सॅम पित्रोदा हे असं व्यक्तिमत्व आहे, जे त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतं. अनेकदा तर त्यांच्या विधानांमुळे नवे वादही निर्माण झालेले आहेत. तर, कधी काँग्रेस पक्षासाठीही त्यांचं विधान अडचणीचं ठरतं. मात्र तरीही पित्रोदा यांची अशाप्रकारची विधान समोर येतच राहतात. आताही त्यांच्या एका विधानावरून भाजपला काँग्रेसवर टीका करायला आयतं कोलीत हाती लागलंय. मात्र आता सॅम पित्रोदा यांनी आपल्या या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलंय.

नेमकं काय म्हणाले होते पित्रोदा? –

सॅम पित्रोदा म्हणाले, “माझ्या मते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे केंद्रबिंदू शेजारी देश असले पाहिजेत. आपण खरंच आपल्या शेजाऱ्यांशी संबंध सुधारू शकतो का? मी पाकिस्तानला गेलो आहे, आणि सांगतो की मला तिथे घरासारखं वाटलं. मी बांगलादेशात, नेपाळातही गेलो आहे आणि तिथेसुद्धा मला घरच्यासारखं भासलं. मला कधीच परदेशी देशात असल्यासारखं वाटलं नाही.”

त्यांच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेत, काँग्रेसवर जोरदार टीका सुरू केली आहे. शिवाय, राहुल गांधींनाही यावरून जाब विचारला जात आहे. प्रकरण अधिकच चिघळत असल्याचे दिसू लागल्यानंतर आता पित्रोदा यांच्याकडून या विधानावर स्पष्टीकरण दिलं गेलं आहे.

Sam Pitroda addressing media after clarifying his Pakistan remark that stirred political controversy.
Woman Cries for Panipuri VIDEO : पाणीपुरीसाठी कायपण…! महिलेन थेट रस्त्यातच ठाण मांडत सुरू केलं मोठ्यानं रडण अन् मग...

पित्रोदांनी काय दिलं स्पष्टीकरण? -

पित्रोदा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, "जर माझ्या शब्दांमुळे नाराजी निर्माण झाली असेल, तर मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझा हेतू कधीही कोणाच्याही दुःखाला क्षुल्लक लेखण्याचा किंवा कायदेशीर चिंतन कमी लेखण्याचा नव्हता. माझा हेतू प्रामाणिक संवाद, सहानुभूती आणि भारत स्वतःला कसे पाहतो आणि इतर ते कसे पाहतात, यावर एक ठोस आणि जबाबदार दृष्टिकोन निर्माण करण्याचा होता."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com