Crime
Former minister injured in a deadly attack inside Lucknow jail : समाजवादी पक्षाचे माजी कॅबिनेट मंत्री आणि अमेठीचे माजी आमदार गायत्री प्रसाद प्रजापती यांच्यावर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील तुरुंगात जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रजापती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना दहापेक्षा जास्त टाके लागले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु या घटनेमुळे तुरुंगाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत, समाजवादी पार्टीचे प्रवक्ते फखरुल हसन चंद यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, "तुरुंगात असलेले माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्यावरील हल्ल्याची बातमी चिंताजनक आहे. तुरुंग प्रशासनाने माजी मंत्र्यांना योग्य वैद्यकीय उपचार द्यावेत!"
गायत्री प्रसाद प्रजापती हे उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकारच्या काळात वाहतूक/खाण/सिंचन मंत्री होते. ते सध्या सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली २०१७ पासून लखनऊ तुरुंगात आहेत. २०२१ मध्ये न्यायालयाने त्यांना सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
गायत्री प्रसाद प्रजापती हे वैद्यकीय उपचारांसाठी तुरुंगातील रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांचा स्वच्छतेचे काम करणाऱ्या एका कैद्याशी वाद झाला , त्यानंतर संबंधित कैद्याने लाकडी फळीने त्यांच्या डोक्यावर वार केले. यानंतर प्रजापतीवर डॉक्टरांनी उपचार केले असून, सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.