मृत्यूशी झूंज देत आहेत अमर सिंह,अमिताभ बच्चन यांची मागितली माफी

Samajwadi Party leader Amar Singh is seriously ill
Samajwadi Party leader Amar Singh is seriously ill

पुणे/सिंगापूर : समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह हे सध्या गंभीर आजारी आहेत, किडनीच्या आजाराने त्रस्त असलेले अमर सिंह सध्या सिंगापूर येथे उपचार घेत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज, त्यांनी भावनीक ट्विट करत त्यांचे जुने मित्र महानायक अमिताभ बच्चन यांची माफी मागितली आहे. 

अमर सिंह यांनी  ट्विट केलं की, 'आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे आणि मला बच्चनजी यांच्याकडून निरोप मिळाला. जीवनाच्या या टप्प्यावर जेव्हा मी आयुष्याची आणि मृत्यूची लढाई लढत असताना अमित जी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरूद्ध केलेल्या माझ्या प्रतिक्रियेबद्दल मला खेद वाटतो. देवा त्या सर्वांना आशीर्वाद दे.' अमर सिंह आणि बच्चन कुटूंब यांच्यात चांगले संबंध होते. वडिलांच्या पुण्यतिथीदिवशी अमिताभ या अमर सिंह यांना दर वर्षी संदेश पाठवत असतात.पण सिंहयांनी बच्चन कुंटूंबाविषयी  केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. पण, आज अमर सिंह यांनी माफी मागत, परत एकदा संबंध सुधारण्याकडे पाऊल टाकले आहे.

नेमकं झालं काय होतं?
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसंबंधी जया बच्चन यांनी केलेल्या भाषणावर अमर सिंह यांनी जोरदार टिका केली होती. त्या वेळी अमर सिंग यांनी बच्चन कुटुंबातील सर्वच जणांनाविषयी वक्तव्य करत जया बच्चन यांनाच जाब विचारला होता. सामाजिक स्वस्थ्य सांभाळणं हे आई आणि पत्नी यांच्या हातात असते. देशात महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी तुम्हा तुमच्या पतीला (अमिताभ बच्चन यांना) जुम्मा चुम्मा दे दे सारख्या गाण्यांवरती नाचणं थांबवयला का सांगत नाही. तसेच तुमची सून ऐश्वर्या हिने ऐ दिल है मुश्किक या चित्रपटात दिलेली भडक दृश्य न करण्यासाठी का सांगत नाहीत. तुमचा मुलगा अभिषेक याला अर्धनग्न नायिका असलेल्या चित्रपटात काम करू नको, असे का सांगत नाहीत, असा थेट सवाल करत, सगळ्या बच्चन कुटूंबाला वादात ओढलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com