Azam Khan News : हेट स्पीच केस प्रकरणात आझम खान यांना 3 वर्षांची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Azam Khan

Azam Khan News : हेट स्पीच केस प्रकरणात आझम खान यांना 3 वर्षांची शिक्षा

Azam Khan News : समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांना गुरुवारी रामपूर न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हेट स्पीच प्रकरणी ही शिक्षा ठोठवण्यात आली आहे. तसेच 2 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांचे विधानसभेचे सदस्यत्वदेखील रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आझम खान हे रामपूरमधून 10 वेळा आमदार राहिले आहेत आणि सपाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. अशा स्थितीत त्यांची आमदारकीदेखील रद्द होण्याची चिन्ह व्यक्त केली जात आहे, असे झाल्यास समाजवादी पक्षासाठी हा फार मोठा धक्का असेल. अयोध्येतील गोसाईगंज येथील भाजप आमदार खब्बू तिवारी यांचे सदस्यत्वही न्यायालयाने दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावल्यानंतर रद्द केले होते.

हेही वाचा: मी गुन्हेगार म्हणून माझे शहरही तसेच? - आझम खान

प्रकरण नेमकं काय?

हेट स्पीटशी संबंधित हे प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील असून, 27 जुलै 2019 रोजी भाजप नेते आकाश सक्सेना यांनी आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आझम खान यांनी रामपूरच्या मिलक विधानसभा मतदारसंघात जनतेला संबोधित करताना पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. याशिवाय अन्य आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. तिन्ही आरोपांमध्ये खान दोषी आढळल्याने आज त्यांना न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.