Bihar Crime News : बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील लागुनियान रघुकंठ गावात एका ऑटोचालकाच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृताचे नाव सोनू कुमार (वय ३० वर्षे) असून त्याचा मृतदेह घरात आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात सोनूची पत्नी स्मिता झा हिला संशयित म्हणून ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.