Video Viral : सांबर थेट जंगलातून आलं गावातील चहाच्या टपरीवर; लोकांनी काय केलं पाहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video Viral : सांबर थेट जंगलातून आलं गावातील चहाच्या टपरीवर; लोकांनी काय केलं पाहा

जंगलात अतिक्रमण केल्यामुळे अनेक प्राण्यांच्या जीवाला धोका पोहोचत आहे. तर अनेक प्राण्यांच्या मानवाकडून हत्याही करण्यात आल्या आहेत. अनेकवेळा जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एका जंगली सांबराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हे सांबर गावातील चहाच्या टपरीवर आलं आहे.

(Sambar Deer Visit Old Tea Stall Viral Video)

हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक सांबर चहाच्या टपरीवर आलं आहे. तर काही लोकं त्याला चहा पाजण्याचा आणि खाद्यपदार्थ खाऊ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ एका वनअधिकाऱ्याने शेअर केला आहे. तर जंगली प्राण्यांना मानवी वस्तीची सवय होणे हे चांगले लक्षण नाही असं वन अधिकाऱ्याने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

टॅग्स :video viraldeer