esakal | जनतेकडून पैसा काढून खास लोकांना दिला जातोय - राहुल गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

जनतेकडून पैसा काढून खास लोकांना दिला जातोय - राहुल गांधी

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : देशातील जनतेकडून पैसा काढून घेतला जातोय आणि तो विशिष्ट लोकांना दिला जातोय, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढवून सरकार मोठी कमाई केली. तरीही देशाच्या मालमत्ता विकल्या जात आहेत, त्यामुळं कमाईचा पैसा नक्की जातोय कुठं? असा सवालही यावेळी राहुल गांधी यांनी केला. केंद्र सरकारच्या कारभारवर भाष्य करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, गेल्या सात वर्षात आपण नवा आर्थिक नमुना पाहिला आहे. एकिकडे नोटाबंदी तर दुसरीकडे पैसे वाटपाचं काम सुरु आहे. सुरुवातीला मोदींनी म्हटलं होतं की, मी नोटाबंदी करतोय नंतर अर्थमंत्री म्हणाले की, आपण कमाई करत आहोत. आता लोक विचार आहेत की कमाईच्या नावाखाली काय सुरु आहे. मग नोटाबंदी नक्की कशासाठी करण्यात आली आहे. शेतकरी, कामगार, छोटे आणि मध्यम व्यावसायिक, पगारी वर्ग, सरकारी कर्मचारी आणि प्रामाणिक उद्योगपती यांच्यावर नोटाबंदी लादून पैसा काढून घेण्यात आला आहे. हा काढून घेतलेल्या पैशातून नक्की कोणाची कमाई होत आहे? मोदींच्या ४-५ मित्रांची? असा सवालही यावेळी राहुल गांधी यांनी केला.

हेही वाचा: हवा प्रदुषणामुळे 40 टक्के भारतीयांचं आयुष्य 9 वर्षांनी होणार कमी

मोदी सध्या सातत्यानं म्हणताहेत, की जीडीपी वाढत आहे. तर अर्थमंत्री म्हणताहेत की, जीडीपी वाढीचा अंदाज दाखवत आहे. आता मला कळालंय की हे कुठल्या जीडीपी बद्दल बोलत आहेत. याचा अर्थ आहे, गॅस-डिझेल-पेट्रोल. पंतप्रधान आणि अर्थमंत्री या गोंधळात आहेत बहुतेक. जेव्हा २०१४मध्ये युपीएचं सरकार गेलं तेव्हा एलपीजी सिलेंडरचा दर ४१० रुपये प्रति सिलेंडर होता. आज याचा दर ८८५ रुपये प्रति सिलेंडर आहे. यामध्ये ११६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आमच्यावेळी पेट्रोलचा दर ७१.५० रुपये प्रतिलिटर होतं. जे आज १०१ रुपये प्रतिलिटर झालं आहे. यामध्येही ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर डिझेल २०१४ मध्ये ५७ रुपये प्रतिलिटर होतं तर आज ८८ रुपये प्रतिलिटर आहे.

हेही वाचा: जलसंपदामंत्री 'करेक्ट कार्यक्रमाच्या' तयारीत

लोक या वाढत्या किंमतींबाबत सरकारला जाब विचारु शकतात. युपीए सरकारच्या काळात सन २०१४मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती १०५ रुपये प्रतिबॅरल होत्या. सध्या त्या ७१ रुपये प्रतिबॅरल आहेत. म्हणजेच आमच्या काळात या किंमती ३२ टक्क्यांनी अधिक होत्या. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचा दर ८८० रुपये होता सध्या हा दर ६५३ रुपये आहे. म्हणजेच गॅसचा दर आज २६ टक्क्यांनी कमी झाला आहे. पण तरीही पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर वाढलेले आहेत.

इंधनातून मिळवलेले २३ लाख कोटी गेले कुठे?

केंद्र सरकारनं २३ लाख कोटी रुपये जीडीपीच्या माध्यमातून कमावले आहेत. हा जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट नव्हे तर गॅस-डिझेल-पेट्रोल आहे. त्यातच आता सरकारकडून सरकारी संपत्ती विकण्याचे प्रकारही सुरु आहेत. त्यामुळं हे २३ लाख कोटी रुपये गेले कुठे? असा सवालही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केला आहे.

loading image
go to top