
ओडिशातील पुरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार संबित पात्रा पराभूत झाले आहेत. बिजू जनता दलाचे उमेदवार पिनकी मिश्र यांनी पात्रा यांनी पात्रांचा 11714 मतांनी पराभव केला आहे. पुरी या मतदारसंघावर 1998 पासून बिजू जनता दलाचे वर्चस्व आहे.
Election Results : भाजपच्या धडाडत्या तोफेचा 11714 मतांनी पराभव
पुरी: ओडिशातील पुरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार संबित पात्रा पराभूत झाले आहेत. बिजू जनता दलाचे उमेदवार पिनकी मिश्र यांनी पात्रा यांनी पात्रांचा 11714 मतांनी पराभव केला आहे. पुरी या मतदारसंघावर 1998 पासून बिजू जनता दलाचे वर्चस्व आहे.
पुरी या मतदारसंघात दोन पक्षांच्या प्रवक्त्यांमध्ये लढाई होती. या मतदारसंघात नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाचे विद्यमान खासदार व प्रवक्ते पिनकी मिश्र आणि भाजपातर्फे संबित पात्रा हे एकमेकांसमोर उभे होते. मिश्रा हे 2009 पासून पुरीतून निवडून येत आहे. संबित पात्रा मुळचे ओडिशाचे असून उत्तर प्रदेशमधील नुकसान भरुन काढण्यासाठी भाजपने ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांवर लक्ष केंद्रीत केले होते. संबित पात्रा हे भाजपचे प्रवक्ते म्हणून देशभरात परिचित आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पुरी लोकसभा मतदारसंघातून पिनकी मिश्र यांना 05 लाख 38 हजार 621 मते मिळाली. तर पात्रा यांना 5 लाख 26 हजार 607 मते मिळाली आहेत. या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सत्यनारायण नायक यांना केवळ 44599 मते मिळाली आहेत. तर बहुजन समाज पक्षाच्या नृसिंह चरण दास यांना 6259 मते मिळाली.
Web Title: Sambit Patra Loses Close Fight Pinaki Mishra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..