मोदी अन् योगी...डबल इंजिनचे सरकार, संबित पात्रांची प्रतिक्रिया | Sambit Patra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambit Patra
मोदी अन् योगी...डबल इंजिनचे सरकार, संबित पात्रांची प्रतिक्रिया

मोदी अन् योगी...डबल इंजिनचे सरकार, संबित पात्रांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊमध्ये एका परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आले आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath) यांनी मोदी व त्यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, आम्ही पण करुन निघालोय,

स्वतःचे तन-मन अर्पण करुन,

जिद्द आहे की एक सूर्योदय करायचा,

आकाशापेक्षा उंच जायचे आहे,

एक नवा भारत घडवायचा आहे!

हेही वाचा: काँग्रेसचे दलितांना पुढे नेण्याचे धोरण दिखाव्याचे : रामदास आठवले

मोदी व योगींच्या या एकत्रित फोटोवर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा (Sambit Patra) म्हणाले, विकासाचे डबल इंजिन. विकास म्हणजे डबल इंजिनचे सरकार, असे पात्रा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. मोदीजी व योगीजी दरम्यान सर्व काही व्यवस्थित चालू आहे, अशी टीका बनवारीलाल शर्मा यांनी पात्रा यांच्या प्रतिक्रियेवर केली आहे. दुसरीकडे डबल इंजिन नाही दोघेही चोर असल्याचा घणाघात नवीन बंधन यांनी केला आहे.

loading image
go to top