काँग्रेसचे दलितांना पुढे नेण्याचे धोरण दिखाव्याचे : रामदास आठवले | Ramdas Athawale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai
काँग्रेसचे दलितांना पुढे नेण्याचे धोरण दिखाव्याचे : रामदास आठवले

काँग्रेसचे दलितांना पुढे नेण्याचे धोरण दिखाव्याचे : रामदास आठवले

मुंबई : राजस्थानमध्ये (Rajasthan Cabinet) सत्ता संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. आज रविवारी (ता.२१) दुपारी चार वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजस्थानमधील मंत्रिमंडळ फेरबदलावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले म्हणाले, की काँग्रेस पक्षाचे (Congress Party) दलितांना पुढे नेण्याचे धोरण दिखाव्याचे आहे. काँग्रेस दलितांना त्यांचे हक्क मिळून देण्यास अयशस्वी ठरले. याच कारणामुळे २०१४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत आले. या फेरबदलाने फरक पडणार नाही. राजस्थानात भाजपची सरकार बनेल,असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: थोडा संयम बाळगायला हवा, यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांना सल्ला

नवीन मंत्रिमंडळात ४ दलितांना स्थान देण्यात आले आहे. आमच्या पक्षाला वाटते, की दलित, उपेक्षित, मागास लोकांना प्रतिनिधित्व प्रत्येक ठिकाणी मिळायला हवे. बऱ्याच दिवसांपासून आमच्या सरकारमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व नव्हते. आता ती भरपाई केली आहे. आदिवासींचेही प्रतिनिधीत्व वाढवले गेले, असे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सांगितले.

loading image
go to top