देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय नाही : संबित पात्रा

'हिंमत असेल तर म्हणावे की मोदींना पर्याय राहुल गांधी आहेत.'
Sambit Patra
Sambit Patra

नवी दिल्ली : काँग्रेसला जेव्हा विचारले जाते की मोदींना पर्याय कोण? ते सांगतात, की १३५ कोटी जनता. याचा अर्थ त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असे भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) म्हणाले. ते एजेंडा 'आजतक'च्या मंचावर बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते कन्हैय्या कुमारही उपस्थित होते. पात्रा पुढे म्हणतात, एक मात्र होईल की राहुल गांधींना पर्याय कन्हैय्या कुमार जरुर आहे. काँग्रेसजवळ (Congress Party) मोदींना कोणताही पर्याय नाही. हिंमत असेल तर म्हणावे की मोदींना (Narendra Modi) पर्याय राहुल गांधी आहेत. त्यांच्या तोंडातून ही मोदींना पर्याय राहुल गांधी आहेत, हे निघत नाही आणि निघाले निवडणूक जिंकायला, असा टोला संबित पात्रा यांनी काँग्रेसला लगावला आहे. ममता बॅनर्जींपासून आखिलेश यादवपर्यंत कोणही राहुल यांना पर्याय मानत नाहीत. मायावतीही असे मानत नाहीत. काँग्रेसच्या आतील जी-२३ गट ही त्यांना पर्याय मानत नाही, असे ते म्हणाले. संबित पात्रा म्हणाले, की राहुल गांधींचा (Rahul Gandhi) पर्याय कन्हैय्या कुमार नक्की असतील.

Sambit Patra
उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर सर्वाधिक अत्याचार होतात : आखिलेश यादव

हे तर मी मानतो. आता राहुल गांधी एकदाही पुढे येऊन मोदींना हरवा असे म्हणत नाहीत. मात्र हे कन्हैय्या कुमार नक्की म्हणत आहेत. यामुळे कन्हैय्या जरुर राहुल यांचा पर्याय बनू शकतो. मात्र संबित पात्रा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, की मोदींना पर्याय राहुल गांधी आहेत. जनता मतदान करेल सत्तेविरुद्ध. जनता ही जनार्दन आहे. मधेच संबित पात्रा म्हणाले, जनताच मतदान करित आहे. मंगळ ग्रहावरुन येऊन कोणी मतदान करणार नाहीत. यावर पटेल म्हणाले, आम्ही जनतेलाच म्हणतोय तुम्हाला नाही. काँग्रेस नेता कन्हैय्या कुमार म्हणाले, की मला भाजपच्या राष्ट्रवादावर काही हरकत नाही. हा एक देश आहे, ज्याला तुम्ही नेशन किंवा कंट्री म्हणता. देश संविधानावर चालतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com