उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर सर्वाधिक अत्याचार होतात : आखिलेश यादव

बाबा मुख्यमंत्र्यांना तर लॅपटाॅपही चालवता येत नाही, असा टोला त्यांनी योगी यांना लगावला आहे.
Akhilesh-Yadav
Akhilesh-Yadav

झाशी : भारत सरकारचे जे आकडे आहेत, त्यात कमीत-कमी हे सांगायल हवे, की भारतात महिला आणि मुलींवर सर्वाधिक अत्याचार कुठे होतात! तर ते उत्तर प्रदेशमध्ये. बनावट चकमकीत (एनकाऊंटर) सर्वात जास्त नोटीसा कोणत्या सरकारला मिळाले असतील तर ते उत्तर प्रदेश सरकार आहे, असा हल्लाबोल समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) प्रमुख आखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर (Yogi Government) केला आहे. यादव हे उत्तर प्रदेशातील झाशी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आखिलेश यादव पुढे म्हणाले, की सरकारने जर आपले आश्वासन पूर्ण केले असते तर लाॅकडाऊनमध्ये (Lock Down) जनता आणि तरुणांचे हाल झाले नसते. ते तर म्हणत होते की लॅपटाॅप, मोबाईल देणार मात्र काय दिले? (Uttar Pradesh)

Akhilesh-Yadav
घाबरू नका! ओमिक्रॉनचा संसर्ग अतिसौम्य | Omicron

आपले बाबा मुख्यमंत्र्यांना तर लॅपटाॅपही चालवता येत नाही, असा टोला त्यांनी योगी यांना लगावला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आताच मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. योगी सरकारने तर राज्यात प्रकल्पांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. दुसरीकडे आखिलेश यादव, योगी आदित्यनाथ किंवा मायावाती हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com