
Sameer Wankhede: आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची महसूल विभागानं केलेली बदली केंद्रीय प्रशासकीय लवादानं रद्दबातल ठरवली आहे. याप्रकरणी लवादानं या बदलीमागील विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन ताशेरे ओढले आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्य़न खान याच्या ड्रग्ज प्रकरणामुळं वानखेडे चर्चेत आले होते.