जेव्हा सॅमसंग मागते युजर्सची माफी...

वृत्तसंस्था
Friday, 21 February 2020

- दक्षिण कोरियाची आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने युजर्सची मागितली माफी.

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने युजर्सची माफी मागितली आहे. कंपनीने ब्रिटनमधील युजर्सच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन पाठवले होते. त्यामुळे कंपनीने माफी मागितली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सॅमसंगच्या Galaxy A50, Galaxy S7 पासून Galaxy Note 10 यांसारख्या डिव्हाईसवर नोटिफिकेशन पाठवले गेले होते. सुमारे 20 टक्के युजर्सना याबाबतचे नोटिफिकेशन मिळाले होते. या नोटिफिकेशनचा परिणाम फोनच्या बॅटरीवर झाला होता. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक युजर्सनी नोटिफिकेशनचा स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला.

निर्भया बलात्कार प्रकरणात आता निवडणूक आयोगाची एन्ट्री

काय होते या नोटिफिकेशनमध्ये

कंपनीने दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये दोन वेळेस केवळ ‘1’ लिहिला होता. हे नोटिफिकेशन सॅमसंगच्या Find My Mobile सर्व्हिसद्वारे पाठवण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samsung Sent a Weird 1 Notification By Mistake And People Started to See Conspiracies