
मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात नर्सिंगचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीची गळा कापून हत्या करण्यात आलीय. जिल्हा रुग्णालयातच घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून ही दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. शुक्रवारी घडलेल्या या घटनेत भरदिवसा आरोपीने चाकूने तरुणी संध्या चौधरी हिची गळा चिरून हत्या केली होती.