esakal | मशिदीसाठी पाडलेली सर्व मंदिरे पुन्हा बांधू - संगीत सोम
sakal

बोलून बातमी शोधा

sangeet som

मशिदीसाठी पाडलेली सर्व मंदिरे पुन्हा बांधू - संगीत सोम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेरठ : मशिदी उभारण्यासाठी पाडण्यात आलेली सर्व मंदिरे भाजप पुन्हा उभारेल, असे उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. येथील प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. मुस्लीम सुद्धा हिंदू आहेत, असेही ते म्हणाले.

मेरठमधील सरढाणा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या गेल्या साडेचार वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी सोम यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. अखिलेश हे हंगामी हिंदू असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, आपली राजवट असताना ज्यांनी साधूंना काठ्यांनी बदडले ते आता हरिद्वारला जाऊन हात जोडून त्यांची माफी मागत आहेत. भगवान विश्वकर्मा मंदिर बांधण्याच्या घोषणा करीत आहेत.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीपूर्वी अनेक मंडळी हंगामी हिंदू बनतात. ज्यांनी भाविकांवर गोळीबार केला ते मंदिरे बांधण्याचे दावे करीत आहेत.सोम यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली आहेत.

loading image
go to top