esakal | शरद पवार राज्य सरकारवर नाराज? दिल्लीत संजय राऊत यांची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

raut

राज्यात सचिन वाझे यांच्यावरून महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावरून गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीची चर्चाही होत आहे.

शरद पवार राज्य सरकारवर नाराज? दिल्लीत संजय राऊत यांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - राज्यात सचिन वाझे यांच्यावरून महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावरून गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीची चर्चाही होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यात सर्वकाही सुरळीत चालू असल्याचं म्हटलं आहे. 

सचिन वाझे प्रकरणावरून गृहमंत्री बदलाची चर्चा सुरु आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राज्याबाबत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी बांधील नाही. राज्यात सर्व काही सुरळीत सुरु आहे. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी तिथले इतर मोठे नेते आहेत असंही संजय राऊत म्हणाले. राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठे नेते आहेत. महाराष्ट्र सरकारबाबत त्यांची काही मते आहेत. ते राज्यातील प्रश्नांबाबत निर्णय घेतील. मोठे आणि अनुभवी नेते मार्गदर्शक असून ते समर्थ असल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रात सुरु असलेल्या गोंधळाबाबत शरद पवार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, पवार साहेबांच्या चेहऱ्यावर तुम्ही कधी नाराजी पाहिली आहे का? ते कधीच नाराज नसतात. ते चिंतन करत असतात. मला नाही वाटत ते नाराज आहेत असं संजय राऊत म्हणाले. 

पवार साहेबांसोबत काय चर्चा झाली याबाबत विचारले असता संजय राऊत यांनी त्यांच्यासोबतची चर्चा फक्त हवा पाण्याची होती असं म्हणत प्रश्नाला बगल दिली. मोठ्या नेत्यांची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत असते असंही राऊत यांनी सांगितलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी तब्बल अर्धा तास चर्चा केली. 

हे वाचा - मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर

दरम्यान, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काय बोलणं झालं असेल याची चर्चा रंगली आहे. असंही म्हटलं जात आहे की, पुण्यात टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यापासून ते हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांच्या बदलीची होत असलेली चर्चा यांवर दोघांमध्ये बोलणं झाल्याची शक्यता आहे.