esakal | योगी सरकारच्या 'हम दो हमारे दो' पॉलिसीवर संजय राऊत म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut-Yogi-Aditya-Nath

योगी सरकारच्या 'हम दो हमारे दो' पॉलिसीवर राऊत म्हणतात...

sakal_logo
By
विराज भागवत

लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे योजना

मुंबई: उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार 'दोन मुलांचे' धोरण आणत आहे. लोकसंख्येचा स्फोट झाल्याने भारतात बेरोजगारी आणि गरीबी वाढली आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण गरजेचं आहे अशा भावनेतून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने 'हम दो हमारे दो' अशा स्वरूपाचं धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांवर आपलं मत व्यक्त केले. (Sanjay Raut Reaction on Yogi Aditya Nath Govt Population Control Bill 2 children only Policy vjb 91)

हेही वाचा: मुंबईकरांनो, जरा जपून... पावसाबद्दल हवामान खात्याकडून इशारा

"उत्तर प्रदेश सरकारने तयार केलेली लोकसंख्या नियंत्रण योजना नक्की कशाप्रकारे काम करते आणि किती परिणामकारक ठरते याचा आम्ही अभ्यास करू. सध्या आम्ही प्रतिक्रिया देणार नाही. आम्ही या योजनेच्या कार्यपद्धतीचे नीट निरिक्षण करून मगच मत नोंदवू. या योजनेचे नेमके परिणाम समोर आले की मगच राष्ट्रीय स्तरावर आम्ही या गोष्टीवर भाष्य करू. पण एक गोष्ट मात्र नक्की की केवळ निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून हे धोरण लागू करण्यात आलं आहे असे होऊ नये. कारण उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसंख्येच्या स्फोटाचे परिणाम देशातील इतर राज्यांनाही भोगावे लागत आहेत", असं रोखठोक पण सावध मत राऊत यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: "हे तर सुनेला पोळ्या जमत नसल्याने पीठ अंगावर ओतून घेण्यासारखं"

मंत्री नवाब मलिक यांचा मात्र धोरणाला विरोध

"हे धोरण महाराष्ट्रात २००० मध्येच तयार करण्यात आलेले आहे. मात्र योगी आदित्यनाथ 'दोन मुले' हे धोरण आणून संपूर्ण देशात गोंधळ घालत आहेत. त्यांनी दोन मुलांऐवजी भाजप नेत्यांच्या वक्तव्यानुसार जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे. दोन मुलांच्यावर मुल झालं तर त्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा शासकीय लाभ घेता येत नाही हे महाराष्ट्रात धोरण ठरलेले आहे. भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत त्यांची मुलं नाहीत. किंवा भाजपची मातृसंस्था RSS मध्येही असे लोक आहेत ज्यांना मुलंच नाहीत. दोन मुलं ही पॉलिसी बर्‍याच राज्यात आहे. त्यामुळे योगींनी 'मुलंच नकोत' ही पॉलिसी अंमलात आणली पाहिजे. कारण मुलं नाहीत त्यांना प्रोत्साहन मिळेल" असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

loading image