
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे. ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी, उत्तर कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आरजी कार येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह अनेक जखमांच्या खुणा असलेला आढळून आला. त्यानंतर या प्रकरणामुळे देशात खळबळ उडाली होती.