Bihar Exam Scam : बिहार पेपरफुटी; ‘राजकीय बस्तान बसावे, यासाठीच पेपर फोडले’, अटकेत असलेल्या आरोपीचा खुलासा
Paper Leak : बिहारमधील स्पर्धा परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी संजीव मुखिया याने चौकशीत पत्नीला राजकारणात उच्चस्थानी नेण्यासाठीच पेपरफोडी केली, अशी कबुली दिली आहे. सीबीआय व इतर यंत्रणांसमोर त्याने मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा दावाही केला.
पाटणा : बिहारमधील स्पर्धा परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी अटकेत असलेला संजीव मुखिया याने चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पत्नीला राजकारणात उच्च पदावर पोहचविणे, हे त्याचे उद्दिष्ट असल्याने पेपर फोडण्यासारखे मार्ग अनुसरल्याची कबुली मुखियाने दिली.