
98th Marathi Sahitya Smmelan : सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा मृत्यू, सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उमटले. मराठवाडा साहित्य परिषदेने यासंदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली. महामंडळ हा ठराव स्वीकारून समारोपावेळी मांडणार का, हे मात्र रविवारीच (ता. २३) स्पष्ट होणार आहे.