
Laxman Uttekar: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा सिनेमातील गणोजी शिर्के यांच्याबाबतच्या माहितीवर शिर्केंच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. इतिहासाची तोडमोड करुन हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आल्याचा आरोप गणोजी शिर्केंच्या वंशजांनी केला आहे. आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हा कट असल्याचं दीपक शिर्के यांनी केला आहे. त्यांच्या आक्षेपानंतर आता छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी त्यांची माफी मागितली आहे.